Breaking News

छावाच्या महाअधिवेशनास हजारो कार्यकर्ते जाणार :लांबे


राहुरी : अखिल भारतीय छावा संघटनेचे येत्या २९ मे रोजी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे महाअधिवेशन होत आहे. या महाधिवेशनासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती अ. भा. छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी दिली.
राहुरी येथे अ. भा. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महाअधिवेशना संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. औरंगाबाद येथील राजीव गांधी मैदान, सिडको बसस्थानक येथे दुपारी ४ . ०० वाजता सदर अधिवेशन पार पडणार आहे. अहमदनगर जिल्हा हा औरंगाबाद जिल्ह्याजवळ असल्यामुळे व जिल्ह्यामध्ये अ. भा. छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब जावळे यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या विचारांवर काम करणारे हजारो कार्यकर्ते ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने अधिवेशनाला जाणार आहेत. 

या बैठकीस अ. भा. छावाचे जिल्हा प्रमुख अशोक चव्हाण, राजेंद्र सावंत, रमेश म्हसे, पप्पू दवंगे, संकेत चव्हाण, अक्षय दहिफळे, ज्ञानेश्वर टेकाळे, कुलदीप नवले, सतीष वाळुंज, सागर पाटील, अमोल वाळुंज, सागर मोरे, अक्षय बोरकर, नवनाथ सप्रे, राजेंद्र लबडे, अतुल जुंबड, अजय जगताप, ज्ञानेश्वर तनपुरे, सचिन चौधरी, महेंद्र आनंदकर आदी उपस्थित होते.