Breaking News

आयटी कंपनीत काम करणार्‍या तरूणीची आत्महत्या

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणार्‍या एका 23 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अंकुश वाघमारे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मारुंजी येथे घडला. पूजा ही आयटी कंपनीत काम करत होती. पूजाच्या मैत्रिणीने घरात प्रवेश केला असता पूजाचा मृतदेह घरात टांगलेल्या अवस्थेत दिसून आल्याने तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पूजाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.