Breaking News

निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मिटला

मुंबई : जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मंगळवारी चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणप्रकरणी हा संप पुक ारण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. बहुतांश मागण्या मान्य झाल्याने अखेर डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याची घोषणा मार्डने केली. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर मार्डने हा संप मागे घेतला.