नृत्यस्पर्धेत ५० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
तहसीलदार अनिल दौंडे, श्रीरामपर उपनगराध्यक्ष करण ससाणे, चैतन्य उद्योग समूह अध्यक्ष गणेश भांड, एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे आदींच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाट्न पार पडले. याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेट अध्यक्ष शिवाजी कपाळे, सभापती मनीषा ओहळ, नायब तहसीलदार गणेश टीळेकर, राहुरी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे, दीपक त्रिभुवन, विजय गव्हाणे, सुरेश दौंड, गोवर्धन येवले, संदीप भगवान कदम, अशोक भोसले, वैभव गिरमे, रामभाऊ येवले, नगरसेविका सुनीता थोरात, सरपंच अमोल भनगडे, सतीश वाळुंज, विलास साळवे आदी उपस्थित संपन्न झाले. जिल्ह्यातील ५० स्पर्धकांनी यास्पर्धेत सहभाग नोंदविला. लावणी, फ़्यूजल, देशभक्तिपर नृत्य प्रकार स्पर्धकानी सादरीकरण सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. संस्थापक वसंत कदम यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला.