Breaking News

पालिकेच्या संगणक कक्षाला अचानक आग


राहुरी वि. प्रतिनिधी - नगरपालिकेच्या संगणक नियंत्रण कक्षाला अचानक आग लागली. आज {दि. ३ } येथील आठवडे बाजारच्या दिवशी नगरपालिकेत रोजच्या प्रमाणे काम सुरु होते. संगणक नियंत्रण कक्षात अचानक धूर निघत असल्याचे येताच या विभागातील सतर्कता दर्शविली. 

या विभागातील वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. आग विझवण्यासाठी अग्निशामन दलास पाचारण करण्यात आले. यावेळी कर्मचारी नरेंद्र मोरे, संतोश डागवाले, राजेंद्र पवार यांनी अग्नीबंब (सिलेंडर) व ड्राय केमिकल पांवडरच्या साहाय्याने आग विझवली. या आगीत लाईट बोर्ड भस्मसात झाले. नगरध्यक्ष प्राजक्त तनपुरे, मुख्यधिकारी नानासाहेब महनोर, विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, नगरसेवक अनिल कासार, दिलीप चौधरी, गजानन सातभाई, संजय साळवे, नंदू तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, शाहजी जाधव, संगिता आहेर आदींसह पालिका अधिकारी आणि कर्मारयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, येथे काही महिन्यांपूर्वी काम केले असल्याचे सांगण्यात आले. मग पालिकेच्या संगणक विभागास आग लागली कशी, यामधे काही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का, विद्युत पुरवठा कमी / जादा झाला का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. या आगीत पालिकेचे किती नुकसान झाले, हे मात्र समजु शकले नाही.