Breaking News

‘अमृतवाहिनी चा उत्कृष्ट निकाल


संगमनेर : तालुक्यातील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (आय. टी. आय.) जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय सत्र परीक्षेच्या प्रथम सेमिस्टरचा निकाल ९६ . ११ टक्के निकाल लागला, अशी माहिती प्राचार्य एस. टी. देशमुख यांनी दिली.

प्रथम सेमिस्टरमध्ये फिटर या ट्रेडचा राहुल गुंजाळ हा विद्यार्थी ७९ . ८६ टक्के गुण मिळवून आय टी आयमध्ये प्रथम आला. आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या संचालिका शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य एस. टी. देशमुख आदींनी सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.