Breaking News

वाघोली परिसरातील वीजविषयक प्रश्‍नांवर लवकरच तोडगा


पुणे - वाघोली व परिसरातील वीजविषयक प्रश्‍नांवर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजयंत्रणेच्या आवश्यक दुरुस्तीसह नवीन वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच नादुरुस्त मीटर बदलून ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यात येणार असल्याची माहिती मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांनी दिली.

वाघोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वाघोली परिसरातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीबाबत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. वीजयंत्रणेची दुरुस्ती कामे करण्यासोबतच आवश्यक ठिकाणी वीजयंत्रणेतील जुने भाग सुद्धा बदलण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 28 लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून कामांना प्रत्यक्षात सुरवात झालेली आहे. याशिवाय क वडेवस्ती येथील रोहित्र स्थानांतरीत करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे तेथे एरियल बंच केबल टाकण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.