Breaking News

पीएमपीएलला संचलन तुटीचे प्रतिमहा 7 कोटी 11 लाख देणार


पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 2017-18 या वर्षातील संचलन तुटीपोटी मागणी करण्यात आलेली पालिकेच्या हिश्याची 60 टक्के रक्कम देण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पीएमपीएलला प्रतिमहा 7 कोटी 11 लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महापालिका पीएमपीएल संस्थेस संचलन तुटीमुळे होणारा खर्च 2013-14 या वर्षापासून देते. 2017-18 या वर्षातील अंदाजित संचलन तूट रुपये 203 कोटी ग‘ाह्य धरली असता पालिकेच्या 60 टक्के स्वामित्व हिश्यानुसार रु 122.34 कोटी होत आहे. त्यानुसार 122 कोटी मधून संबंधित बँकांनी ओव्हरड्रॉफ्टची रक्कम कळविलेनुसार अंदाजे 34 कोटी समायोजित करणे आवश्यक ठरते. त्यानुसार 122 कोटी मधून 34 कोटी रुपये समायोजित केले असता उर्वरीत रक्कम रुपये 88 कोटी पीएमपाएल 12 समान हप्त्यामध्ये अदा करता येतील. पालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रक ात पीएमपीएल संस्थेस संचलन तुटीपोटी करण्यात आलेल्या तरतूदीमधून प्रतिमहा रूपये 7 कोटी 11 लाख रुपये मिळणार आहे