महिला पोलीस कर्मचारीने पेटवून घेतले
जामखेड : येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सोनाली जाधव-साळुंखेने पोलिस वसाहतीतील राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. शनिवारी {दि. १२} रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. आरडाओरड झाल्याने तिच्या पतीने आणि पोलिसांनी तिला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी प्राथमिक उपचार केले. मात्र नंतर तिला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जामखेड पोलिस ठाण्यात दोन वर्षांपासून सदर महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक तिने जाळून घेतले. यात ती ३० ते ३५ टक्के भाजली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिला पोलीस कर्मचारी जाधव-साळुंखेहिने का जाळून घेतले, याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी दोनच दिवसांपूर्वी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर आणि शिक्रापूर [पुणे] येथील पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना ताज्या असतानांच जामखेड पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी जाधव-साळुंखे हिने जाळून घेतले. या घटनांवरून पोलीस दलातील संतोषची खदखद बाहेर पडत आहे.