सामान्यांपर्यंत राजीव गांधींंचे कार्य पोहोचवले पाहिजे -धर्मण्णा सादूल
सोलापूर - केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच माहिती व तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आणि आज कॉम्प्युटर व स्मार्ट फोनचे जाळे संपूर्ण भारत देशात पसरले आहे. आजच्या पिढीला राजीव गांधी यांनी केलेले कार्य व बलिदान, त्याग याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली पाहिजे, असे मत माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी व्यक्त केले.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. काँग्रेसचे कार्यकर्ते मन्सूर यांच्या वतीने कॉँग्रेस भवनमधील कर्मचार्यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कपडे भेट देण्यात आले.
