Breaking News

साप्ताहिक सुटटीत ‘ते’ राबविताहेत स्वच्छता अभियान!


कोपरगाव येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि कोकमठाण येथील रामदासी बाबा भक्त मंडळाचे प्रमुख शरद थोरात आणि त्यांचे सहकारी शहरात दर रविवारी साप्ताहिक सुटटीत स्वच्छता अभियान हाती घेत आहेत. या कार्याची अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. श्रीक्षेत्र कोकमठाण येथील रामदासीबाबा मंदिर परिसर, पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर परिसर, गोपालन रक्षा केंद्र आणि अन्य परिसर या सर्वांनी या रविवारी {दि. ६ } स्वच्छ केला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून स्वच्छतेची मोहिम सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सर्व मंत्रीदेखील आपापल्या परिसरात स्वच्छतेला सध्या विशेष महत्व देत आहेत. या पार्श्वभूमीवर थोरात आणि त्यांचे सहकारी गेल्या ५८ रविवारपासून हा उपक्रम राबवित आहेत.

यासंदर्भात थोरात म्हणाले, की श्रीक्षेत्र कोकमठाण परिसरातील ब्रम्हलिन संत योगी रामदासी बाबा यांनी लहानांपासून ते मोठयापर्यंत अनेक संस्कार रुजविले आहेत. त्यामुळे या परिसराची स्वच्छता ठेवणे आणि त्यातून मनाची प्रसन्नता वाढविणे यावर आम्ही काम करीत आहोत. गोदापात्रात होणारे प्रदूषण थांबविण्यावरदेखील आम्ही सातत्याने भर देत आहोत. या कार्यातून सतत प्रेरणेची उर्जा मिळत राहते.