Breaking News

अवैध धंद्यांप्रकरणी चौघांविरुद्ध कारवाई



राहुरी : तालुक्यातील देवळालीप्रवरा, वांबोरी यासह शहरात विविध ठिकाणी देशी, विदेशी हातभट्टी, दारु बाळगणारयावर पोलिसांनी छापा टाकला. यात चौघांना जेरबंद करण्यात आले. मुंबई पोलिस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यात अजय शामराव जाधव {रा. देवळाली, वडारवाडा}, रविंद्र दिगंबर डुक्रे, गणेश किसन भिसे, रविंद्र शहाजी येवले या चौघांचा समावेश आहे. या कारवाईमुळे तालुक्यात अवैध दारु विक्री करणारयामधे खळबळ उडाली आहे.