Breaking News

‘कृष्णा-गोदाकाठचे योगी : रामदासी बाबा’ दुसरी आवृत्ती लवकरच


कोपरगाव : योगी रामदासीबाबा यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारे ‘कृष्णा-गोदाकाठचे योगी : रामदासी बाबा’ हे पुस्तक सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज आणि श्री श्री १००८ गणेशानंद महाराज, सागरानंद महाराज यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. दुस-या आवृत्तीचे काम सुरू झाले आहे. ही आवृत्ती लवकरच उपलब्ध होणार आहे. 

तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलीन संत योगी रामदासीबाबा यांच्याविषयी भक्तांना आलेल्या अनुभव कथनाचे या आवृत्तीमध्ये प्रकाशित केले जाणार आहे. त्यासाठी भक्तांचे काही अनुभव, रामदासीबाबासमवेत दुर्मिळ व महत्वाच्या प्रसंगाची छायाचित्रे असल्यास त्या भक्तांनी सदर माहिती दि. ३० मेपर्यंत रामदासी बाबा भक्त मंडळ, श्रीक्षेत्र कोकमठाण येथे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या माहितीसोबत स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो पाठवावा.