Breaking News

एकलव्य यांची जयंती देवळाली प्रवरा येथे मोठ्या उत्साहात साजरी


राहुरी तालुका प्रतिनिधी - महाभारत काळात गुरु द्रोणाचार्यांचा केवळ पुतळा समोर ठेऊन एकलव्य धर्नुविद्या कलेत प्रविण झाले. त्यांनी श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनासमोर आव्हान उभे केले होते. मात्र गुरू द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून डाव्या हाताचा अंगठा मागताच मोठ्या मनाने ज्यांनी तो कापून दिला, अशा एकलव्य यांची जयंती देवळाली प्रवरा येथे आज (दि.२५) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यानिमित्त सकाळी वीर एकलव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे, चैतन्य उद्योग समुहाचे गणेश भांड, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संजय बर्डे, सुनीता थोरात, सुवर्णा ढवळे, एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बर्डे, विशाल बर्डे आदी यावेळी उपस्थित होते. शिवाजीराव ढवळे यांनी वीर एकलव्य जीवनकार्याविषयी उपस्थित बांधवाना माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी. गँग, एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते.