Breaking News

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बालेश्वर : भारताने ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राची सोमवारी ओडिशाच्या तटावर यशस्वी चाचणी घेतली. भारत व रशियाद्वारे संयुक्तपणे विकसित करण्यात आलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला चांदीपूर परीक्षण रेंज अर्थात आयटीआरच्या प्रक्षेपण पॅड ३ वरून दागण्यात आले. सकाळी १० वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओ व टीम ब्राह्मोसकडून पहिल्यांदा भारतामध्ये विकसित करण्यात आलेल्या 'जीवन विस्तार' तंत्रज्ञान तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे वैज्ञानिक आणि ब्राह्मोस टीमचे अभिनंदन केले..