महिला अायपीएलसाठी वानखेडेवर रंगीत तालीम
महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर अाणि महाराष्ट्राच्या प्रतिभावंत युवा फलंदाज स्मृती मंधाना यांच्यात सामना रंगणार अाहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर मंगळवारी हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. या सामन्यासाठी संघांच्या नेतृत्वाची धुरा या दाेन्ही युवा खेळाडूंवर साेपवण्यात अाली. अायपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यापूर्वी ही लढत हाेईल, अशी माहिती चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली. महिलांच्या अायपीएल अायाेजनाचा बीसीसीअायचा मानस अाहे. त्याची रंगीत तालीम म्हणूनच याचे अायाेजन करण्यात अाले.
