Breaking News

पंडित नेहरुंनी देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली - आदिक


श्रीरामपूर - पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी पंतप्रधानपदाच्या 17 वर्षांच्या कार्यकाळात आधुनिक विकासासाठी देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळविण्यासाठी व देशाच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांनी स्वतःला कार्यात झोकून दिले होते. असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.

नगरपरिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालयात देशाचे दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेस हार घालुन अभिवादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक ताराचंद रणदिवे, अ‍ॅड. संतोष कांबळे, कलीम कुरेशी, दिपक चव्हाण, पंडीत बोंबले, सरवरअली सय्यद, सुमीत मुथ्था, गणीभाई, विजय शेलार, सुधार आडांगळे, अनिरुद्ध भिंगरवाला, ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, ग्रंथपाल स्वाती पुरे आदि उपस्थित होते. आदिक पुढे म्हणाल्या की देशाप्रमाणेच जगाला शांततेचा संदेश देवून पंचशील ही लाखमोलाची देणगी समस्त जगाला नेहरुंनी दिली. त्यामुळेच त्यांना शांतीदूत ही पदवी बहाल करुन सन्मानित करण्यात आले होते.