Breaking News

सायना, वैष्णवी विजयी; अाॅस्ट्रेलिया संघावर मात


सलामीच्या पराभवातून सावरलेल्या सायनाने अापल्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाला विजय मिळवून दिला. तिच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिलांनी थाॅमस/उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत साेमवारी अाॅस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताच्या महिलांनी ४-१ ने दुसरा सामना जिंकला.
दुहेरीच्या लढतीत भारताच्या मेघना अाणि पूर्वीशाला पराभवाचा सामना करावा लागला.
सायना विजयी ट्रॅकवर : सायना अवघ्या ३५ मिनिटांत विजयी ट्रॅकवर परतली. तिने पहिल्याच लढतीत अाॅस्ट्रेलियाच्या सुअान वेंडीवर २१-१४, २१-१९ ने मात केली.