Breaking News

जखमी राअाेनिकची फ्रेंच अाेपनमधून माघार

वृत्तसंस्था | पॅरिस
कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकने यंदाच्या अागामी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. त्याने गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. येत्या २९ मेपासून फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. त्याला नुकत्याच झालेल्या माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्याला पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत कॅनडाच्याच डेनिस शापाेवालाेवने पराभूत केले. त्यामुळे ताे स्पर्धेतही फार काळ अाव्हान कायम ठेवू शकला नाही. अाता या दुुखापतीमधून पूर्णपणे सावरण्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णयही त्याने घेतला. ताे या स्पर्धेनंतर काेर्टवर परतेल.