Breaking News

विद्युत पर्यवेक्षक तारतंत्री परवाना प्राप्‍ती मार्गदर्शन मेळावा 28 मे ला

अहमदनगर दि. 21 - महाराष्‍ट्र राज्‍य शासनाच्‍या उद्योग उर्जा व कामगार विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्‍या विद्युत निरीक्षण विभागाकडून विद्युत ठेकेदार अनुज्ञप्‍ती देण्‍याबाबत तारतंत्री व विद्युत पर्यवेक्षक परवाना आणि विद्युत ठेकेदार अनुज्ञाप्‍ती मिळविण्‍याबाबत विद्युत निरीक्षक कार्यालय, विद्युत निरीक्षक विभाग दुसरा मजला कमर्शियल बिर्ल्‍डीग मार्केट याडै महात्‍मा फुले चौक अहमदनगर येथे दिनांक 28 मे 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता मार्गदर्शन मेळावा आयेाजित करण्‍यात आला आहे.

या मेळाव्‍यात विद्युत पर्यवेक्षक परवाना प्राप्‍त झालेल्‍या तसेच अभियांत्रिकी मधील पदवी पदविका प्राप्‍त व त्‍यानंतर एक वर्षाचा अनुभव असलेल्‍या अभियांत्‍यांना विद्युत पर्यवेक्षक परवाना मिळाल्‍यानंतर विद्युत ठेकेदार अनुज्ञप्‍ती तसेच आय टी आय वायरमन इलेक्टि्शियन ट्रेड उत्‍तीर्ण झालेल्‍यांना ही तारतंत्री व विद्युतम पर्यवेक्षक परवाना मिळण्‍याबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. या मेळाव्‍यास उपस्थित राहून लाभ घेण्‍याचे आवाहन विद्युत निरीक्षक आ.हु. मुजावर यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे.