आयपीएल बुकी प्रकरणात भाजपाचे पदाधिकारी
जळगांव, दि. 06, मे - आयपीएल बुकी प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील भाजपाचे पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांना रायगडातील खालापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी सात वाजता चोपड्यातून अटक केली. या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या चौक गावातील लिलाई हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा बेटींग सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एका ब ँक मॅनेजरसह पाच बुकींना तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. आरोपींच्या ताब्यातून सव्वा लाखांची रोकडही जप्त करण्यात आली होती. पोलीस चौकशीत आरोपींचे पुण्यातील बुकीशी कनेक्शन आढळल्यानंतर विजय अग्रवाल या बुकीस अटक करण्यात आली तर त्याने घनश्याम अग्रवाल यांचे नाव बुकी म्हणून सांगितल्यानंतर व त्यांच्याकडे कटींग फिरवल्याची माहिती दिल्यानंतर अग्रवाल यांना शनिवारी संकाळी खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शेलार व त्यांच्या पथकाने अटक केली. तसेच या प्रकरणात पाच बड्या बुकींसह एक बँक मॅनेजर मिळून एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.