सहाय्यक आयुक्त गायकवाड ठरले ‘ऑफिसर ऑफ द मंथ’
मुंबई, दि. 06, मे - महापालिकेच्या ‘ई’ विभागातील नागपाडा जंक्शन परिसराच्या सुशोभिकरणाची कार्यवाही प्रगतीपथावर नेणे, ’वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ येथील पें ग्वीन दर्शन इमारतीशी साधर्म्य ठेऊन केलेले परिसराचे सुशोभिकरण व आकर्षक लॅण्ड स्केपींग यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविणारे आणि अतिक्रमणांसह विविध अनधिकृत बाबींबाबत ठाम भू मिका घेऊन कार्यवाही करणारे ’ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांचा ’मे 2018’ साठी ’महिन्याचे मानकरी’ या बहुमानाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालायातील पेंग्वीन ईमारतीच्या सभागृहात आयोजित मासिक बैठकी दरम्यान गायकवाड यांचा ’ऑफीसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने सत्कार करण्यात आला. साहेबराव गायकवाड हे ऑगस्ट 1987 पासून महापालिकेच्या सेवेत आहेत. तर मे 2014 पासून ते सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. सुरुवातीला ’आर दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त असणारे श्री. गायकवाड हे ऑक्टोबर 2017 पासून ’ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत. सध्याच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यासह विविध अनधिकृत बाबींबाबत सातत्याने ठाम भूमिका घेत कार्यवाही व कारवाई केली आहे. त्याचबरोबर नागपाडा जंक्शनसारख्या ऐतिहासिक परिसराचे प्रस्तावित सुशोभिकरण देखील श्री. गायकवाड यांच्याच कार्यकाळात मार्गी लागले आहे. महापालिकेच्या ’ई’ विभागामध्ये भायखळा, चिंचपोकळी, नागपाडा, काळाचौकी, शिवडी, रे रोड, लकडी बंदर, डॉकयार्ड रोड, भंडारवाडा, ताडवाडी, जे, जे. रुग्णालय, मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा यासारख्या परिसरांचा समावेश होतो.