Breaking News

… तरच विद्यार्थ्यांना प्रगती शक्य : डॉ. पाटील


राहुरी: ज्ञानाची साधना करावयाची असेल तर मन प्रसन्न असायला हवे, हेच नेमके सात्रळच्या रयत संकुलमध्ये पहावयास मिळते. विद्यार्थ्यांनी नेहमी माझे अस्तित्त्व कशासाठी हे स्वतःला विचारले पाहिजे. तरच त्याला प्रगती करता येईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव व राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील यांनी केले. 
सात्रळच्या रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, बापू सहादू कडू पाटील, कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय येथे कृष्णागर जेजुरकर पुरस्कृत गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि थोर देणगीदार कृष्णागर जेजुरकर हे होते. 

प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, गुरुशिष्याची उच्च परंपरा ही जगात फक्त भारतातच आहे. जीवनात काहीही व्हा. पण एक विसरू नका, माणसाचे जगणं काय असत, हे कॉ. पी. बी. कडू पाटील आणि व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातून शिकावे. प्रारंभी प्राचार्य एल. बी. आसावा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, रयतचे माजी विभागीय अधिकारी बी. वाय. शिरसाठ, माजी सहाय्यक विभागीय अधिकारी झरे, रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, थोर माजी विद्यार्थी प्रा.कृष्णागर जेजुरकर, माजी विभागीय अधिकारी बी. वाय. शिरसाठ, माजी सहाय्यक विभागीय अधिकारी झडे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य एल. बी. आसावा, रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, बबनराव कडू, भगवान गागरे, वसंतराव गागरे, भास्करराव फणसे, शांतीलाल गांधी, डॉ. के. के. बोरा, ज्ञानदेव दिघे, पत्रकार किशोर भांड, ए. डी. सी. सी. बँकेचे पवार, समशेर पठाण, पंढरीनाथ हिरगळ, शिक्षणप्रेमी पालक व शिक्षक आदी प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक गोसावी आणि मंगेश कडलग यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य एल. बी. आसावा, मुख्याध्यापिका सी. एस. सोनार, रयत सेवक संघाचे सरचिटणीस बी. पी. पेटकर, पर्यवेक्षक बी. बी. गोसावी, रयत संकुलातील सर्व शिक्षक व सेवक वर्ग आदींनी पुढाकार घेतला. पर्यवेक्षक बी. बी. गोसावी यांनी आभार प्रदर्शन केले.