Breaking News

शंभुभक्त सेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदी घुले


राहुरी : राज्यात कार्यरत असलेल्या शंभुभक्त सेनेच्या राहुरी तालुका युवक अध्यक्षपदी अमोल घुले यांची तर उपाध्यक्षपदी संकेत घुले यांची नुकतीच नियुक्ति करण्यात आली. 

खा. उदयनराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज कदम, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिंगटे आणि कार्याध्यक्ष अशोक खामकर यांच्या नेतृत्वाखाली शंभुभक्त सेना संघटना कार्यरत आहे. राहुरी तालुका अध्यक्ष युवक पदाची जबाबदारी अमोल घुले व उपाध्यक्षपदाची संकेत घुले यांच्यावर एका नियुक्ति पत्राद्वारे सोपविण्यात आली. यावेळी सुधीर झांबरे, ऋषि पोटे, अक्षय कवाणे, आकाश शेटे, सुमेध सोजवळ आदी उपस्थित होते.