Breaking News

औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी कृष्ण प्रकाश ? पोलीस खात्यातही होणार मोठे बदल

मुंबई/प्रतिनिधी : दोन गटात झालेल्या दंगलीनंतर आता औरंगाबाद शहर पूर्वपदावर आले आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त पदावर आयपीएस कृष्ण प्रकाश यांची वर्णी होणार असल्याची चर्चा सध्या पोलीस खात्यात सुरू आहे. तशा प्रकारच्या गृहखात्याकडून हालचाली सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. मार्च 2018 मध्ये औरंगाबादमध्ये महिला आणि लहान मुलांना झालेला मारहाणीवरून मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. या यानंतर औरंगाबादच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त भार मिलिंद भारंबे यांच्याकडे देण्यात आला होता, मात्र काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसेनंतर आता पोलीस आयुक्तपदवर क ृष्ण प्रकाश यांची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. 

येत्या चार महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. 31 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत मुंबई पोलीस दलाचे आयुक्त दत्ता पडसलगीक रांसह अन्य चार महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांची सेवानिवृत्ती होत आहे. यामध्ये राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर सह पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाचे व्ही. डी. मिश्रा याच्या नावाचाही समावेश आहे. 1985च्या आयपीएस बॅचचे असणारे व्ही. डी. मिश्रा यांची ‘रिटायरमेंट’ पहिल्यांदा 31 मे रोजी होईल. चार बड्या अधिकार्‍यांची सेवा निवृत्ती इतक्या कमी कालावधीत होत असल्याने या चारही पदांवरील नियुक्त्या करणे हे मुख्यमंत्र्यांसाठी आव्हान आहे.