Breaking News

तुकाराम गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ


कोल्हार : कोल्हार भगवतीपूर येथे अधिक मासानिमित्त तुकाराम गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचा नुकताच मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी कोल्हारचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे आणि भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे या दोहोंच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 
यानिमित्त ध्वजारोहन, गाथा पूजन व दिपप्रज्वलन करून कोल्हार भगवतीपूर येथे अधिक मासानिमित्त आयोजित तुकाराम गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. ह. भ. प. रामदास उर्फ शिवराज महाराज जाधव यांच्या अमृत वाणीतून संगीतमय भागवत कथा ज्ञानभक्ती महोत्सवाचे कथा निरुपन व रोज तुकाराम महाराज गाथा पारायण होणार आहे. १९ मेपासून सुरु झालेल्या या पारायण सोहळ्याची सांगता दि. २६ मे रोजी होणार आहे. 

या ज्ञानभक्ती महोत्सवात संत तुकाराम महाराज पारायण सोहळा व श्रीमद भागवतकथेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट व समस्त ग्रामस्थाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी कोल्हारचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे, विश्वस्त नंदू खांदे, बापूसाहेब देवकर आदींसह भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.