Breaking News

‘गांधीगिरी’ करीत वाटले मोफत दूध!

राहुरी प्रतिनिधी, मशिनद्वारे कृत्रिम दूध उत्पादन त्वरित बंद करावे, या मागणीचे तालुक्यातील अखिल भारतीय किसान संघटना व एकलव्य संघटना यांच्यावतीने नायब तहसीलदारांना दि. ५ मे रोजी देण्यात आले. ‘लुटता कशाला फुकटच दुध प्या’, असे म्हणत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचार्यांना मोफत दूध वाटप करण्यात आले.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झाल्याने भाव कमी झाल्याचे सरकार सांगत आहे. मात्र सरकारच्या मान्यतेने दुधाच्या एका टँकरचे मशीनद्वारे तीन टँकर करण्यात येत आहे. शेतकर्यांकडून जास्त फॅटचे दूध घेऊन ग्राहकाला कमी फॅटचे दूध देण्यात येत आहे. मशीनच्या दुधामुळे दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. तसेच हे कृत्रिम दुध एक प्रकारचे विषच आहे. त्यामुळे सरकारने मशीनच्या दुधाचे उत्पादन बंद करावे. तसेच सरकारने शेतकर्यांची होणारी १० रुपयांची होणारी लूट स्वत: सहन करुन शेतकर्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान द्यावे. सरकारने दुध प्रश्नावर तातडीने दोडगा काढावा. अन्यथा राज्यभरातील सर्व दूध उत्पादक जिल्हाधिकारी कार्यालयावर व तहसील कार्यालयावर मोफत दुध वाटण्याचे आंदोलन हाती घेतील.

सदर निवेदनावर गोरख देवकर, नामदेव पवार, सागर कुसमूडे, नागेश देवकर, उमेश कुसमूडे, गणेश येवले, बबलू लफरे, अमर पवार, किरण कुसमूडे, श्रीकांत मंजूळे, नवनाथ शिंदे, पांडूरंग कुसळकर, शरद पवार, अक्षय खांदे आदींच्या सह्या आहेत.