Breaking News

मंत्रालय व बीडीडी इमारतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात जाणिवपुर्वक विलंब ; शिस्तभंग कारवाईचे निर्देश

मुंबई/विशेष प्रतिनिधी। 30: मंत्रालय व बीडीडीसारख्या अतिमहत्वाच्या इमारतीच्या कामात संगनमत करून झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीतही पुन्हा संगनमत झाल्याचा दाट संशय शासन पातळीवर व्यक्त होत असल्याने संबंधीत चौकशी अधिकार्‍यांवर शिस्तंभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेला दुजोरा देणारे आदेश साबां सचिवांच्या क ार्यालयातून आदेशही निर्गमीत झाल्याचेअधिकृत वृत्त आहे.
राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालय इमारतीहसह बीडीडी व वेगवेगळ्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याने शासनाची पारदर्शकता डेब्रीजच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली. प्रतिमा आणि प्रतिष्ठाही लिलावात निघाली. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचे आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून या अपहाराकडे लक्ष वेधले. शासन पातळीवरून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मार्गी लागली. वेळोवेळी चौकशीचे आदेश झाले.माञ मंञालय इमारतीच्या कामात भ्रष्टाचार करतांना निर्माण केलेले डंपींग ग्राऊंड चौकशी अधिकार्‍यांसाठी वापरले गेले. परिणामी चौकशी अहवाल प्रलंबित ठेवला गेला. शासनाच्या निदर्शनास ही बाब आल्याने अधिक रिस्क घ्यायची नाही या निर्णयाप्रत सरकार आले असून चौकशी प्रक्रियेतील शुक्राचार्य दुर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून लवकरच त्याचे परिणाम दिसतील असा कयास व्यक्त केला जात आहे. (क्रमशः)