यंदाही मुलींची बाजी बारावीचा राज्याचा निकाल 88.41 टक्के ; कोकण विभागाचा आघाडी कायम ;
पुणे - राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांप्रमाणेच यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के इतका लागला आहे.
यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून, 92.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, मुलांची टक्केवारी 85.23 इतकी आहे. विभागवार निकालात कोकण (94.85 टक्के) सर्वोत्तम ठरला आहे तर, नाशिकचा निकाल (86.13 टक्के) सर्वात कमी आहे. राज्यातील नऊ विभागात एकूण 14 लाख 18 हजार 645 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 12 लाख 52 हजार 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुली 92.36 टक्के तर, मुलांची टक्केवारी 85.23 इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच 5379 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 4932 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात 90 टक्के किंवा त्यापेक्षा ज्यास्त गुण मिळणार्या एकूण विद्यार्थीची संख्या 5486 इतकी आहे. विभागवार विचार केला तर मुंबई विभागात सर्वाधिक 2288 विद्यार्थ्यांना 90 किंवा त्यापेक्षा ज्यास्त गुण मिळाले आहेत. पुणे विभागात 790, नागपूर 698, अमरावती 594, कोल्हापूर 350, औरंगाबाद 284, लातूर 259, नाशिक 156 तर कोकण विभागातील अशा विद्यार्थ्यांची संख्या 57 आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्ये 12 जूनला सकाळी 11 वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
विभागनिहाय निकाल
कोकण - 94.85
पुणे - 89.58
नागपूर - 87.57
औरंगाबाद - 88.74
मुंबई - 87.44
कोल्हापूर - 91.00
अमरावती - 88.08
नाशिक - 86.13
लातूर - 88.31
शाखानिहाय निकाल
विज्ञान - 95.85
कला - 78.93
वाणिज्य - 89.50
व्यवसाय अभ्यासक्रम - 88.41