देशातला सर्वात मोठा बुकी सोनू मालाडला अटक
मुंबई - भारतातील सट्टा बाजारातील नामचीन बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू योगेंद्र जालान उर्फ सोनू मालाड यास अटक केली आहे. या बुकीचे देशासह देशाबाहेरही ग्राहक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या अटकेमुळे आता आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील सर्वात मोठा बुकी म्हणून सोनू जालान हा कृप्रसिद्ध आहे. बुकी सोनू जालान याचे सट्टा बाजारात फक्त देशातच नाही तर अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तानातही सट्टा बाजाराशी निगडित ग्राहक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात राहणारा बुकी सोनू जालान याला या अगोदरच क्रिकेट बेटिंग संदर्भात अटक झालेली होती.
भारतात सट्टा बाजारात कोलकाता, राजस्थान, गुजरात, हरीयाणा आणि दिल्ली येथील आपल्या हस्तकांमार्फत सोनू जालान हा सट्टा चालवीत होता. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक निवडणूक आणि आयपीएल दरम्यान मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपयांचा सट्टा खेळला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक केली आहे.