मतदान केंद्रे या ठिकाणी सखोल संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम
अहमदनगर दि. 21- लोकसभा निवडणूक 2019 पूर्वीचा हा शेवटचा सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम असल्यामुळे जिल्हयातील 12 विधानसभा मतदार संघातील 3 हजार 599 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची कार्यालये तथा मतदान केंद्रे या ठिकाणी सखोल संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम जिल्हयामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा सखोल पुनःरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश नवीन मतदार नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहीत मतदार याद्या तयार करणे हा आहे. या मतदार याद्या पुनःरिक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी हे मतदार नोंदणी अधिकारी तर तहसीलदार हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पहात आहेत.या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबाजवणी करण्याकरिता जिल्हयातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दिनांक 15 मे 2018 ते 20 जून 2018 या कालावधीमध्ये मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन बी.एल.ओ. रजिस्टर अद्यायावत आणि सखोलपणे पूर्ण करण्याच काम करणार आहेत. घरोघरी भेटीच्या या मोहिमेमध्ये दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी करणे तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या नवयुवक व युवतीची मतदार नोंदणी करणे, मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून वगळणी करणे, मतदारांच्या तपशीलमध्ये जसे नाव , पत्ता, लिंग , छायाचित्रयामध्ये काही दुरुस्ती असल्यास मतदार नोंदवहीमध्ये त्याबाबत नोंदी घेणे इत्यादी कामकाज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पूर्ण करतील या कामकाजावर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे नियंत्रण राहणार असून संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांचे नियुक्त भागात व गावात प्रत्यक्ष भेटीचे कामकाज करीत आहे अथवा कसे याबाबत तहसीलदार स्तरावरुन त्या त्या गावातील नागरिकाकडून दुरध्वनी , भ्रमणध्वनीद्वारे पडताळणी देखील करण्यात येणार आहे.