मराठा सोयरीक ग्रुप काळाची गरज आहे - जी.डी.खानदेशे
नगर - बदलत्या परिस्थितीत मराठा समाजाने ही मुला मुलींसाठी स्थळे पाहण्यामध्ये श्रम,वेळ आणि पैशांची बचत करून मराठा सोयरीक ग्रुपच्या वधूवर मेळाव्यात सामील होवून विवाह ठरवावे व न लाजता नावनोंदणी करावी असे आवाहन अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सेक्रेटरी जी.डी खानदेशे साहेब यांनी केले.
अहमदनगर येथील न्यू आर्टस कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये प्रथमच मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने विवाहेच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांचा राज्यव्यापी 21 वा मेळावा आयोजित केला होता. या वेळी मराठा सोयरीक ग्रुपचे संकल्पक जयकिसन वाघ पाटील. जिल्हा मराठा प्रसारक समाजाचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ , ग्रुपचे संचालक अशोक कुटे, उपप्राचार्य रोहिदास कोल्हे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी खानदेशे सर म्हणाले की, मुला- मुलींसाठी स्थळे पाहण्याचे काम अधिक तापदायक व वेळखाऊ बनत आहे.त्यामुळे मराठा समाजामध्ये वधूवर मेळावे घेण्याचे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. ह्या मेळाव्यातील प्रचंड प्रतिसादामुळे हॉल पूर्णपणे भरुन बर्याच लोकांना जागा अपूरी पडली होती.
असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा व ग्रुपच्या संचालिका जयश्री कुटे यांनी सांगितले कि, मराठा समाजातील मुले-मुली ही आता उच्च शिक्षण घेवून नोकरया व उद्योग व्यवसायात पुढे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराविषयी अपेक्षा वाढत असून वधूवर मेळाव्यामुळे अनुरूप स्थळे मिळू शकतात, असे सांगितले. तसेच पुढील मेळावे तारखा शिरूर मध्ये स्टॅण्ड जवळ शनिवार 26 मे , पुण्यात औंधमध्ये रविवारी 27 मे अशा तारखांचा वधु वरांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
चांगला जोडीदार मिळणे ही जीवनाची अर्धी लढाई जिंकाल्यासारखीच आहे. त्यामुळे अशा मेळाव्यांची गरज असल्याचे मत विठ्ठलराव गुंजाळ यांनी व्यक्त केले.