हा तर बालीशपणा : राहुल गांधी
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग 16 दिवस वाढ झाल्यानंतर आज अवघ्या 1 पैशाने घसरण झाली. या मुद्यावरून काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. ही दर कपात म्हणजे ’जनतेची क्रूर थट्टा’ असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे, की डिअर पंतप्रधान, आज तुम्ही प्रेट्रोल आणि डिझेलचे दर 1 पैशाने कमी केले. जर ही तुंमची मजाक करण्याची पद्धत असेल, तर ती अत्यंत बालिशपणाची आणि जनतेची क्रूर थट्टा आहे. मागच्या आठवड्यात, मी तुम्हाला तेलाचे दर कमी क रण्याचे चॅलेंज दिले होते. मात्र, 1 पैशाने दर कमी करणे हा साजेसा प्रतिसाद नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
