Breaking News

पेट्रोल 1 पैशांनी स्वस्त ; ग्राहकांची थट्टा

मुंबई -गेल्या 16 दिवसांपासून पेट्रोल दरवाढीवरुन सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडलेली नाही. त्यात बुधवारी पेट्रोलच्या दरात 1 पैशाची कपात करुन सरकारने विरोधकांना आयतीच संधी दिली आहे. पेट्रोल-डीझेलचे दर 60 पैशांनी कमी झाल्याने मिळालेला दिलासा काही तासांपुरताच होता. पेट्रोलच्या दरात 60 पैशांनी घट झाली नसून फक्त 1 पैशांनी झाली असल्याचे इंडियन ऑईलने स्पष्ट केले आहे. दिल्लीत 60 पैसे व मुंबईत 59 पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याचे इंडियन ऑईलने घोषित केले होते. या घोषणेत चूक झाली असून दोन्ही शहरांमध्ये पेट्रोल केवळ 1 पैशांनी स्वस्त झाल्याचे इंडियन ऑईलने सांगितले आहे. डिझेलच्या किमतीतही दिल्लीत 56 पैसे व मुंबईत 59 पैशांऐवजी 1 पैशाची घट झाल्याचे इंडियन ऑईलने स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसलेली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर एका चुक ीमुळे तिथे 60 पैशांची कपात दिसत होती. चूक लक्षात येताच कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आणि पेट्रोलच्या दरात फक्त एका पैशाचीच कपात केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तेल कंपन्यांच्या या प्रकारामुळे देशातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे. इंधन दरवाढीवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल. इंधनाच्या उत्पादनात घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली दरवाढ इंधनाच्या किंमतीच्या चढ- उताराला कारणीभूत असल्याचे, पेट्रो लियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.