भाजप आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एका महिलेने बदाऊचे भाजप आमदार कुशाग्र सागर यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. लग्नाच्या आमिषाने सागर यांनी 2 वर्षे बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. माझी आई त्यांच्याकडे काम करत होती. मी पण तेथे तिच्याबरोबर जात होते. तेव्हा त्यांनी लग्नाचे वचन देऊन सातत्याने 2 वर्षे माझ्यावर बलात्कार केला. आता आमदार झाल्यानंतर त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती पीडितेने दिली. पीडितेने तक्रार दाखल केली असून न्याय न मिळाल्यास आत्महत्येची धमकी दिली आहे. मला धमक्या येत असून समाजामध्ये माझी बदनामी होत असल्याचे पीडितेने म्हटले आहे.