Breaking News

संत ज्ञानेश्वर स्कूल ‘समर कॅम्प’ समारोप


कोपरगाव : येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मातोश्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘समर कॅम्प’'चा नुकताच समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे होते.

यावेळी ‘रयत’चे उत्तर विभागीय सल्लागार सदस्य दिपक साळूंके, दिलीप सोनवणे, शाळेचे संस्थापक राजेंद्र झावरे, दिलीप अरगडे, बाळासाहेब सिनगर, शाळेचे समन्वयक पोपटराव झुरळे, विशाल झावरे, अॅड. शंकर यादव, आदी उपस्थित होते.