Breaking News

रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत


कोपरगाव : शहरात गेल्या वर्षांपासून कोपरगाव नगरपालिकेने पाणी पुरवठा करण्यासाठी रस्ते खोदून नवीन पाईपलाईन केली आहे. परंतु यामुळे झालेले खड्डे डांबर आणि खडी टाकून व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत.

परिणामी शहरात छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना ये-जा करताना खूप त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील रस्त्यांवरील सर्वच खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे