Breaking News

वयोवृद्ध महिलेचे गंठण लांबविले


राहुरी येथील बसस्थानकात ६५ वर्षीय वृध्द महिलेचे ४ तोळ्याचे गंठण एका महिलेने लंपास केले. सी सी टि व्ही कॅमेरेत हा प्रकार कैद झाला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दि. ५ रोजी दुपारी तीनच्या ही घटना घडली. येथील गयाबाई मारुती घनवट या महिलेचे येथील बसस्थानकात पाथर्डी एस. टी. बसमध्ये गाडीत चढत असतांना ही चोरी झाली. दरम्यान, गंठण लंपास करणाऱ्या या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी या घटनेचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.