Breaking News

पत्रकार जाधव यांना पुरस्कार प्रदान


संगमनेर : तालुक्यातील समनापूर येथील पत्रकार व नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव व त्यांच्या पत्नी शारदा जाधव यांना नुकताच पुणे येथे राष्ट्रीय नाभिक महासंघ व महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ यांच्यावतीने ‘समाजगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी नंदकिशोर वर्मा, किसन मनाला, खा. अमर साबळे, मराठी अभिनेता गणेश यादव, जगदीश नाईक, भगवान बिडवे, दत्ता अनारसे आदी यावेळी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश सस्कर, विजय जाधव, भारत शिंदे, कचरु भालेकर, रामनाथ बिडवे, संजय बिडवे, दत्तु जाधव, रणजित जाधव, अशोक सस्कर, कैलास सस्कर, सोमनाथ मदने व तालुक्यातील पत्रकारांनी जाधव यांचे अभिनंदन केले आहे.