Breaking News

गोवंश जनावरांची पोलिसांनी केली सुटका


संगमनेर : शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार हाती घेताच नवे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी कत्तलीसाठी एका काटवनात बांधलेली चार गोवंश जनावरांची सुटका केली. याप्रकरणी शिराज गुलाम कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला उशिराने अटक करण्यात आली.
पोलिस निरीक्षक अनमुलवार यांना कत्तलीच्या उद्देशाने जीवंत जनावरे मदिनानगरमध्ये एका वाड्यासमोर बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज, दि. २७ दुपारी दीड वाजता सपोनि गावंडे, पो. ना. आरवडे, पो. कॉ. तळेकर आदींसह अन्य पोलिस पथकासह संबधित ठिकाणी कारवाई केली. विशेष म्हणजे या जनावरांना चारा पाणी न देता त्यांना उपाशी तसेच ऊन्हात बांधून ठेवण्यात आले होते. शहर पोलिस ठाण्यातील अमृत शिवाजी आढाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिराज गुलाम कुरेशी याच्याविरोधात गुन्हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.