Breaking News

भुजबळांना जामीन मंजूर झाल्याने आनंदोत्सव

राहुरी प्रतिनिधी - माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने राहुरी तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भुजबळ समर्थक, सराफ संघटना, नाभिक संघटना, मुलनिवासी संघटना तसेच समता परिषद आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द, देवळाली प्रवरा, केसापूर, राहुरी फँक्टरी, ब्राम्हणी, वांबोरी आदी गावांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शहरातील शनी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटण्यात आले. यावेळी बोलतांना नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे यांनी म्हणाले, भाजपचे अनेक नेते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. सरकार त्यांना क्लीन चिट देत आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते छगनराव भुजबळ यांना केवळ राजकीय आकसापोटी तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. या प्रकरणातून लवकरच त्यांची निर्दोष मुक्तता होईल.