Breaking News

हार्डिकर यांची ७ रोजी जयंती


संगमनेर : काँग्रेस सेवादलाचे मुख्य संस्थापक हार्डिकर यांची दि. ७ मे रोजी अहमदनगर काँग्रेस सेवादलाच्यावतीने काँग्रेस कमिटी ऑफिस येथे जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष केशवराव मुर्तडक यांनी केले आहे. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाच्या मुख्य संघटकपदी लालजी देसाई यांची निवड झाली असून ते ६ मे रोजी ते प्रथमच पुणे येथे येत आहेत. काँग्रेस सेवादलाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्य आणि जिल्ह्यातील काँग्रेस सेवादलाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेस सेवादलाच्यावतीने करण्यात आले आहे.