Breaking News

राहाता तालुक्यात बॅनरबाजीला आले उधान!


राहाता : तालुक्यात बेकायदा फ्लेक्स बोर्डवर प्रशासन फार काही कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे शिर्डी, निमगाव, सावळीविहीर, साकुरी आदींसह विविध गावात प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांसह वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आणि संघटनांचे हजारो रुपये करून बॅनर लावले जात आहेत. शिर्डीसह पंचक्रोशीत या डिजिटल फ्लेक्स बोर्डला मोठे उधाण आले आहे. फ्लेक्स लावल्याप्रकरणी जामखेडची घटना ताजी असताना तालुक्यातील चौकाचौकांत रात्रीबेरात्री लावले जाणारे हे फ्लेक्स रोखण्याचे काम स्थानिक प्रशासन कधी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. 
अनधिकृत फलक रोखण्याची जबाबदारी तहसीलदार, मुख्याधिकारी, ग्रामविकास, अधिकारी आणि पोलिसांची संयुक्तपणे जबाबदारी याकडे असलेल्या दुर्लक्षामुळे गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणावर टोळ्या तयार होत आहे. या टोळ्या पोलिसांना डोकेदुखी ठरत असतात. शहरात डिजिटल बोर्ड तयार करून देणाऱ्यांची माहिती प्रशासनाकडे आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणीतून प्रशासनाची सुटका होऊ शकते. मात्र त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.