आयपीएल कार्यक्रमात बदल;प्ले ऑफ सामन्यांच्या ठिकाणे बदलली
कोलकाता वृत्तसंस्था - आयपीएल २०१८ च्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून हा बदल प्लेऑफ सामन्यांशी निगडीत आहे. पुण्यात आयपीएलचे दोन प्ले ऑफसामने खेळविण्यात येणार होते. पण यात आता बदल करण्यात आला आहे. आता कोलकातातील इडन गार्डन येथे हे सामने होणार आहेत.
या वृत्ताला आयपीएल संचालन परिषदेने दुजोरा दिला असून यावर आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष राजीव शुक्ला बोलताना म्हणाले, की एलिमिनेटरआणि क्वालिफायर-२ हे दोन सामने पुणे येथे २३ आणि २५ मेला आयोजित करण्यात आले होते. पण आता हे दोन्ही सामने २३ आणि २५ मेला कोलकात्याच्याइडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत.
बंगाल क्रिकेट संघाचे अध्यक्ष दालमिया म्हणाले, की प्लेऑफचे यजमानपद आम्हाला मिळाल्याने आनंद झाला आहे. या सामन्यांची आम्ही आतुरतेने वाटपाहत आहोत. क्वालिफायर-१ सामना २२ मेला तर २७ मेला फायनल हे दोन्ही मुंबईतच पार पडणार, असेही दालमिया यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोलकात्याच्या इडन गार्डन्सची प्रेक्षक क्षमता पुण्याच्या मैदानापेक्षा जास्त असल्यामुळे सामन्याचा आनंद जास्तीत जास्त चाहत्यांना घेता यावा, यासाठीसामने पुणे ऐवजी कोलकात्यात हलविण्याच्या निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आयपीएल संचालन परिषदेने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.