Breaking News

निराधारांतून झाले डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि किर्तनकार!


शिर्डी निमगांव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे महंत स्वामी काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निराधार मुलांना शिक्षणाची व राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या मुलांवर धार्मिक संस्कार करण्यात येऊन त्यांना हरिपाठ, गायन, वादन, हार्मोनियम, प्रितम प्रवचन आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास करून घेतल्याने २८ वर्षांत हातून जवळपास १ हजार ३०० विद्यार्थी विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. यातील काही विद्यार्थी, डॉक्टर, वकील इंजिनिअर, कीर्तनकार झाले आहेत.
यासंदर्भात महंत स्वामी काशिकानंद महाराज म्हणाले, की समाजामध्ये आज बंधूभाव आणि जिव्हाळा आणि संतांचा सहवास कमी होत आहे. या ३ आश्रमात असलेल्या अल्पवयीन मुलांना धर्म संस्काराची शिकवण देतो. ज्ञानेश्वर, एकनाथ आदींसह विविध संतांची माहिती आणि अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला आहे. संतसंगतीचे चांगलेच परिणाम होतात. वाईट संगतीचे परिणाम वाईट होतात, हे जरी सत्य असले तरी आमच्या चांगल्या कामासाठी साईबाबा संस्थान मुलांना दोनवेळचे जेवण देतो. वर्षातून एकदा शिर्डी ते पंढरपूर अशी पालखी काढत असतो. त्या माध्यमातून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या प्रचार आणि प्रसार केला जातो. यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, सामाजिक कार्यकर्ते कैलास कोते, विजय कोते आदींसह निमगावच्या ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. या आश्रमासाठी विठ्ठलराव नारायण कातोरे यांनी जागा दिली आहे.