एअरसेल-मॅक्सिस प्रकरण चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. चिदंबरम यांनी येथील पटियाला हाऊस न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. चिदंबरम यांच्या याचिकेवर न्यायलयाने ईडीला 5 जूनपर्यंत आपला जवाब नोंदवण्यास सांगितले आहे. चिदंबरम यांना 5 जूनला न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. वरिष्ठ वकील व काँग्रेस नेते कपिल सिब्बल चिदंबरम यांची बाजू न्यायालयात मांडतील. पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना अयएनक्स मीडिया प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. वडिलांच्या हवाल्याने कार्ती यांनी आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणुकीसाठी एफआयपीबीचे क्लियरन्स पत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीद्वारे करण्यात आलेल्या तपासात पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी एफआयपीबीतर्फे दिलेली मंजुरी अधिकारबाह्य असल्याचे आढळले.
