पालघरमध्ये रात्रीतून मतदानाचा टक्का कसा वाढला? : शिवसेनेचा सवाल
पालघर - लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यातच एकूण मतदानाच्या टक्केवारीत रातोरात अचानक 6.72 टक्क्यांनी वाढ झाल्याने जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सोमवारी जिल्ह्यातील संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री 46.50 टक्के इतके मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध केले होते. पण, अचानक दुसर्या दिवशी सकाळी 53.22 टक्के मतदान झाल्याचे प्रसिद्धीपत्रक आल्याने, सर्वांचाच गोंधळ उडाला.
प्रत्येक मत निर्णायक असताना पालघरच्या या पोटनिवडणुकीत एका रात्रीत असे काय घडले? की, मतदानाची टक्केवारी 1-2 नव्हे तर तब्बल 6.72 टक्क्यांनी वाढली? ही वाढलेली मते थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 82,737 इतकी आहेत. ही मते कुणाला विजयी करणार, या एकाच चर्चेने गोंधळ घातला आहे.
पालघरच्या पोटनिवडणुकीत मतदान झाल्यानंतर सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बुथवरील माहिती घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी रात्री सरासरी मतदान 46.50 टक्के झाल्याचे जाहीर केले. दुसर्या दिवशी ताळेबंद घेऊन अंतिम टक्केवारी जाहीर केली जाते. त्यात सरासरी टक्केवारी पेक्षा फार तर 1-2 टक्क्यांचा फरक असू शकतो, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. या निवडणुकीत 53.22 टक्के मतदान झाल्याची प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आली. त्यात तब्बल 6.72 टक्के म्हणजेच पावणेसात टक्के मतदान वाढलेले दिसून आले.
सोमवारच्या प्रेसनोटमध्ये 84,950 मतदारांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते, तर मंगळवारी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये 8,87,687 मतदारांनी मतदान केल्याचे प्रसिद्ध केले. याचाच अर्थ एका रात्रीत आचानक 82737 इतकी मते वाढली. पोटनिवडणुकीत आधीच मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे एक-एक मत निर्णायक असताना एका रात्रीत अचानक टक्केवारी वाढून ती 53.22 झाली. मतदानाची टक्केवारी रातोरात इतक्या मोठ्या प्रमाणावर कशी वाढली? ही मते कुणासाठी विजयास्त्र ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.