Breaking News

वरूर येथे ग्रामसभा खेळीमेळीत


वरुर - शेवगाव तालुक्यातील वरूर येथील ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सकाळी ठीक 8 वा. सरपंच मनीषा भागवत लव्हाट यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच गोपाळ केशव खांबट यांचे हस्ते जिल्हा परिषषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी 10 वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी सहाय्यक पर्हे यांनी शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व चालू वर्षी कोणतेही शेतकर्‍यांनी बिलाशिवाय बी बियाणे, खत खरेदी करू नये व छापील किमतीपेक्षा जादा पैसे देऊ नये याविषयी मार्गदर्शन केले. व बंदी असलेल्या वाणांची बियाणांची माहिती ग्रामस्थांना दिली. 

तर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वारे यांनी प्रोसिडिंग वाचून दाखवले तसेच ग्रामसभेमध्ये प्रधानमंत्री स्वास्थ विमा योजना मतदार याद्यांचे वाचन दुरुस्ती व नवीन मतदार नोंदणी या संदर्भात माहिती कोलते यांनी ग्रामस्थांना दिली तर कामगार तलाठी यांनी वरूर खुर्द गावासाठी चुकीची आणेवारी लावल्यामुळे वरुर खुर्द जलयुक्त शिवार योजनेमध्ये बसले नाही त्यामुळे आणेवारी दुरुस्त करून वरुर खुर्दला जलयुक्त शिवार योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी प्रवीण म्हस्के यांनी केली, तर सालवडगाव रोडवरील वावरे वस्तीला टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी रवींद्र वावरे यांनी ग्रामसभेत मांडली . आरोग्य अधिकार्‍यांना मात्र ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले पिण्याच्या पाण्याच्या टाकीशेजारी साचलेले पाणी व त्यापासून सुटलेली दुर्गंधी गावांतील सांडपाण्याची दुरवस्था यावर मात्र आरोग्याधिकारी कडे कुठलेही उत्तर नव्हते . ग्रामसभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.