पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू - पाकिस्तानकडून नियमितमपणे युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे. आता शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैनिकांनी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) अंदाधुंद गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने पुन्हा युद्धबंदीचे उलंघनकरून बघल डेरा भागात रात्री 12.30 वाजदा गोळीबार केला. यात मोहम्मद इखलाक (22) या तरुणाचा गोळीलागून मृत्यू झाला. तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. पाकिस्तानकडून गोळीबार होताच त्याला भारतीय लष्करानेही जबरदस्त प्रत्यूत्तर दिली, असेही पोलीस अधिकार्याने सांगितले आहे.