Breaking News

तालमीच्या हौदाची भिंत कोसळली


कोल्हार : सुमारे ४० वर्षे असलेली कोल्हार येथील एकमेव तालमीच्या हौदाची भिंत काल सकाळी अचानक कोसळली. याठिकाणी व्यायाम करणारे सुमारे १२ ते १५ मल्ल दैव बलवत्तर म्हणून बचावले. 

काल सकाळी सातच्या सुमारास काही पैलवान व्यायाम करीत होते. तर काही हौदामध्ये कुस्ती खेळून एकमेकांची ताकद अजमावत होते. नेमकी याच वेळी पश्चिमेच्या दिशेने असणारी हौदातील भिंत धाड करून कोसळली. यावेळी मोठ मोठे दगड पैलवानांच्या दिशेने आले परंतु सुदैवाने हौदातील पैलवान पूर्वेच्या बाजूस सराव करीत होते. त्यामुळे कोणासही दुखापत झाली नाही. सदर तालमीचे बांधकाम व व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा मल्लांकडून होत आहे.